Header Ads Widget

Responsive Image

ट्रक लूटप्रकरणी महिला सह तिघांना ठोकल्या बेड्या...... गांवातून काढली धिंड


ट्रक लूटप्रकरणी महिला सह तिघांना ठोकल्या बेड्या...... गांवातून काढली धिंड 

पारोळा :-  प्रतिनिधी 

ट्रक लूटप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित सह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरी केलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. 

सचिन शालिक गायकवाड, रा. मडक्या मारुती चौक, पारोळा, असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कुटी पेप MH 19-
BK - 9711 पंचांसमक्ष काढून दिली.

या गुन्ह्यातील संशयित ज्‍योतीबाई गोपी पाटील यांनी त्यांचे आणखी तीन साथी दारांसह मागील महिन्यात दोन ट्रक लूटले होते. संशितांच्या तीन साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. संशयित सचिन गायकवाड व ज्‍योतीबाई पाटील यांना पारोळा पोलिसांनी 11 रोजी अटक केली.

दोन्ही संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

सदरील कारवाई पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, उपनिरीक्षक राजू जाधव, शेखर डोमाळे, सहाय्यक फौजदार जयवंत पाटील कॉ. राहुल कोळी,आशिष गायकवाड,अनिल वाघ, किशोर पाटील यांनी केली.

Post a Comment

0 Comments