शहरातील सर्वात जास्त कर देणारी व्यापारी वस्ती असलेल्या प्रभाग क्र. ९ मध्ये भुयारी गटारीचा कामामुळे रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे.
प्रभागातील स्टेट बँक ते भागवत रोड, बस स्टॅण्ड रोड वरील निकृष्ट कामाबाबत मागील काळात तक्रार करून पुन्हा करण्यास चौधरी यांनी भाग पाडले होते.
पाचपावली देवी ते विजय फरसाण रोड, डॉ.अंजली चव्हाण ( भागवत रोड ) ते दुर्गा टी डेपो ( मेन बाजार ) तसेच स्टेट बँक ते बस स्टॅण्ड ठिकाणी भुयारी गटाराचे काम पूर्ण होऊन सहा महिने होऊन देखील रस्त्यांची कामे होत नसल्याने रहिवासी व व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंकज चौधरी, जिल्हा नियोजन समिती जळगाव यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सदर रस्ते तात्काळ करावे. अशी मागणी केली आहे.
सदर रस्ते तात्काळ न केल्यास व्यापारी बांधव व नागरी हितार्थ आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे निवेदनात म्हटले आहे.
पांच पावली देवी ते गीता प्रोव्हिजन पर्यत निविदा देखील निघाली होती. परंतु निधीमुळे काम थांबले असल्याचे व तात्काळ करण्याचे आश्वासन मुख्या धिकारी प्रशांत सरोदे यांनी दिले आहे. निवेदनावर पंकज पंडित चौधरी व अक्षय अग्रवाल यांचा स्वाक्षरी आहे.
0 Comments