Header Ads Widget

Responsive Image

अकोला महानगरपालिकेला निधी न मिळाल्याने नगरसेवकानेच बांधला स्वखर्चातून रस्ता ..... परिसरातील नागरिकांनी मानले आभार


अकोला महानगरपालिकेला निधी न मिळाल्याने नगरसेवकानेच बांधला स्व:खर्चातून रस्ता...... परिसरातील नागरिकांनी मानले आभार


अकोला :- ( गुलाम मोहसीन )

गेल्या 5 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक फिरोज खान यांनी महानगर पालिकेकडे हमजा प्लॉट रोडचा रस्ता तयार करण्याची वारंवार मागणी करूनही या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला नाही.

पावसामुळे या रस्त्यावर पाणी तुंबून नागरिकांना व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते ही बाब लक्षात घेऊन फिरोज खान यांनी स्वत:च्या खिशातून नाझीम किराणा ते मारिया मेडिकल हा रस्ता तयार केला असल्याची व यापुढे हि असेच कार्य व सेवा करू अशी माहिती फिरोज खान यांनी दिली आहे.


सुमारे 5 लाख रुपये स्व:खर्चून हा रस्ता तयार झाल्याने परिसरातील नागरिकां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. व परिसरातील नागरिकांनी फिरोज खान यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments