कानशिवानी येथे गुरू शिष्य जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये 11 एप्रिल ते 14 पर्यंत जोतिबा फुले जयंती,भीम गीत कार्यक्रम, त्याच बरोबर गावातील होतकरू विद्यार्थ्यांना कुठे तरी सन्मानित करण्यात आले पाहिजे त्या करिता संत कबीर क्रिडा व शिक्षण बहुद्देशीय संस्था कानशिवानी, यांनी 14 एप्रिल चा शुभ प्रसंग पाहून त्यां संस्थेचे अध्यक्ष प्रविण शांताराम वाहूरवाघ यांनी नियोजन केले त्याच बरोबर नुकतेच यश प्रत झालेल्या सुजाता ताई गजानन शेळके ( पोलीस उपनिरीक्षक) या पदासाठी निवड झाली आहे यांच्या सत्कार घेण्यात आला त्याच बरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे हरीओम गणेश राखोंडे,प्रकल्प अधिकारी सहायक आयुक्ता आदिवासी विकास प्रकल्प अकोला श्री राजेंद्र बी हिवाळे साहेब आणि विजयकुमार गडलिंग मानवधिकार, संदीप खंडारे श्रीधर डोंगरे त्याच बरोबर पंचायत समिती अकोला या ठिकाणी सभापती पदावर निवड झालेले राजेश वावकर ह्या सगळे आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती होते.
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून अरुण पाटील वाघमारे, आकाश भाऊ आरेकर हे होते आणि आजच्या कार्यक्रमाचे संचालन हे देवगण इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन हे हरीओम गणेश राखोंडे यांनी केले .
त्याच बरोबर संध्याकाळी संपूर्ण गावातून रॅली काढून त्या मध्ये लाठी काठी, लेझीम, भावरा याचे मुलांना ट्रेनिंग देण्यात आले होते त्याचे सुद्धा प्रदर्शन कार्यात आले व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिम टायगर ग्रुप यांचे सहकार्य लाभले.
0 Comments