March 09, 2022
अकोला,दि.9(जिमाका)- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात प्रलंबित असलेले अवादांकीत बदल अर्ज निकाली काढण्याकरीता दि. 14 ते 25 मार्च या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. धर्मादाय आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व विधीज्ञ व विश्वस्तांनी प्रलंबित अवादांकीत बदल अर्जाची आवश्यक ती पुर्तता करून बदल अर्ज जास्तीत जास्त प्रमाणात निकाली काढावे. तसेच पुर्ततेअभावी प्रलंबित असलेले बदल अर्ज विशेष मोहिम कालावधीत दाखल दस्तऐवजांचे आधारे निकाली काढण्यात येतील, अशी माहिती धर्मादाय उपआयुक्त वि.र. सोनुने यांनी दिली आहे.
0 Comments