Header Ads Widget

Responsive Image

हातरून येथील रस्त्याच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार , शासनाच्या नियमाची पायमल्ली

हातरून येथील रस्त्याच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार , शासनाच्या नियमाची पायमल्ली

बाळापूर :-  वसीम अहेमद 

 
बाळापूर तालुक्यातील हातरून गावातील वार्ड क्रमांक १ मध्ये मा. पालकमंत्री यांनी २५ लाखाचं रोजगार हमी योजना अंतर्गत रस्त्याचे काम मंजूर केले. परंतु ठेकेदार हे आपली मनमानी करतांना दिसत आहेत व रस्त्याचे काम देखील निकृष्ट व थातूर मातुर करून मलिदा लाटतांना दिसत आहे.


 बाळापूर तालुक्यातील हातरून गांवात वार्ड क्र.१ मध्ये संबंधित ठेकेदार हे रोजगार हमी योजने अंतर्गत गावातील नागरिकांना रोजगार द्यायला हवा तर संबंधित ठेकेदाराने अकोल्यातील मजुर बोलावुन त्यांना रोजगार दिला तसेच रोडाच्या कामात देखील संबंधित ठेकेदाराने इस्टीमेट नुसार काम करतांना दिसत नाही आहे सदरील रोडाचे काम करतांना अगोदर मुरूम टाकून धूम्मास करावे लागते परंतु संबंधित ठेकेदार हा कुठल्याही प्रकारचा मुरूम न टाकता डायरेक्ट सिमेंट चा माल टाकताना दिसत आहे व शासनाची फसवणूक करीत आहे.

 तरी संबंधित कामाची तपासणी करन्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन तपासणी करणे गरजेचे असते परंतु अद्याप पर्यंत कोणतेही अधिकारी यांनी कामाची पाहणी केली नाही यावरून 'तेरी भी चूप मेरी भी चूप 'चा प्रत्यय येत आहे. व संबंधित ठेकेदार अधीकारी यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती व निवेदन मा. तहसीलदार साहेब व गट विकास अधिकारी यांना वसीम अहेमद तमीज अहेमद यांनी दिले आहे.
  आता यावर संबंधित अधिकारी काय व कश्या प्रकारे कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments