नवाब मलिक यांना घेऊन ईडीचे अधिकारी जेजे रुग्णालयात पोहोचेले आहेत. जेजे रुग्णालयात मेडिकल करण्यात येईल. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येईल. गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नवाब मलिकांची आठ तास नंतरची प्रतिक्रिया
नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. नवाब मलिक यांचं जेजे रुग्णालयात अर्धा तास मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती आहे.
आता नंबर अनिल परब यांचा असेल, किरीट सोमय्या
अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक आणि तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही दादागिरी केली तरी आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सध्या मेडिकल करण्यात येत आहे. दुसरीकडे मुंबई सेशन कोर्टातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पहाटे साडे चार वाजता ईडीच्या गाड्या त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. पावणे आठच्या सुमारास नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणलं होतं. त्यानंतर जवळपास आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
ऍड. उज्वल निकम याचीं प्रतिक्रिया
नवाब मलिक यांना ईडी कोठडी मिळाली तर कायदेशीर आव्हान देण्याचा अधिकार आहे. ईडी कोठडी मिळेल की नाही याबद्दल सांगता येणार नाही. नवाब मलिक यांच्यावर काय आरोप आहेत हे सांगता येणार आहे. नवाब मलिक यांना अटक होणं हे यंत्रणेकडं सकृतदर्शनी पुरावा असावा असं वाटतं. न्यायालयात या कारवाईमागे राजकीय हेतूनं प्रेरित अटक नाही ना याची तपासणी केली जाईल. नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांना जामीन मिळेल, असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.
0 Comments