अकोला :- व्यसनमुक्ती साठी प्रयत्न करणारे आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटना यांचा सत्कार
अकोला --- संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती महाराष्ट्र व म. रा. धोबी ( परीट ) सर्व भाषिक महासंघ महाराष्ट्र यांचे वतिने गेल्या १० वर्षे पासून दरवर्षी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्सव विविध प्रकारचे उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार आता कोविड कमी झाल्या ने या वर्षी मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी करण्यात येणार आहे.
स्थानिक प्रमिलाताई ओक हॉल येथे २३ फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता पासून दुपारी ३ वाजेपर्यंत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकम संपन्न होणार आहे.
यामध्ये दारू बंदीसाठी, व्यसनमुक्ती साठी प्रयत्न करणारे आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटना यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या उत्सव कार्यक्रमाचे उदघाटक माजी केंद्रीय मंत्री खा संजय धोत्रे ,पालकमंत्री ओमप्रकाश ( बच्चू ) कडू विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी हे असतील तर कार्यक्रम अध्यक्ष राजू बुंदेले हे असतील कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी यांचे व्याख्यान आणि समाजातील नवं निर्वाचित ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,सदस्य कोरोना योद्धा,सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर महाप्रसाद नंतर कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती आज महाराष्ट्र धोबी समाज महासंघ कार्याध्यक्ष अनिल शिंदे,संत गाडगेबाबा जयंती उत्सव समिती मार्गदर्शक राजू बुंदेले,युवा जिल्हाध्यक्ष सचिन शहाकार,महिला जिल्हाध्यक्ष मीनाताई कवड़े, जिल्हाध्यक्ष गोपाल मोकळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सर्वश्री उपाध्यक्ष प्रेमसेठ कनोजिया,महा सचिव पुरुषोत्तम आडोळकर,कोषाध्यक्ष हरिष मस्के, दादाराव बाभूळकर,सर्वज्ञ बुंदेले, ऍड.विजय शिरले,गणेश बावस्कर आकाश कवडे,गजानन थुंकेकर जिल्हाध्यक्ष धोबी समाज कैलास अमृतकर,श्रीकांत शिंदे सागर अत्तरकर,राजू नेरकर राजू अत्तरकर जनार्धन निंबाळकर,गजानन चांदेलकर, प्रदीप मंजुरकर, गुडू अत्तरकर, सागर रामेकर, मंगेश शिंदे, शुभम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments