Header Ads Widget

Responsive Image

मुलगी पाहायला गेले आणि लग्न करून आले....



असा हि एक आदर्श विवाह.....

मुलगी पाहायला गेले आणि लग्न करून आले....

 अकोला :-  दि.4/12/2021
सध्या कोरोनाचा हाहाकार पाहता ह्या कोरोना ने सगळ्यांचा हाताचे काम पळविले अश्यातच.... मुलीचा विवाह म्हटला तर नवरी मुलीच्या बापाला टेन्शन आलेल्या पाहुण्याची पाहुणचारी, मुलीला दागिने, नातेवाईकांना बोलावणे, गावातील नातेवाईक, गावकरी, यांना बोलावणे जेवण देणे.... या विचारानेच बिचारे आई  - वडिल परेशान होतात..
   पण असाच एक किस्सा अकोल्यात घडला अकोल्यातील सालासार बालाजी मंदिर जवळील गो - शाळेत साक्री तालुक्यातील मुलगा आणि वाशिम जिल्ह्यातील मुलगी.
  मुलीच्या घरची परिस्थिती नाजुक ती आपल्या मावशीकडे अकोला येथे सालासार बालाजी मंदिर जवळील गो - शाळा,बाळापूर रोड येथे आलेली, मुलीच्या मावशीला बहिणीच्या मुलीच्या लग्नाची चिंता अश्यातच मावशीच्या ओळखीतील इसम (मामा ) यांना मुलीच्या लग्नाविषयी वर बघण्यास सांगितले आणि मामाने हि गोष्ट त्याचा मलकापूर येथील मित्र मनोज पाटील यास सांगितली त्यांनी त्यांचा शब्दाला मान देत मनोज पाटील यांचा अमळनेर येथील मित्र नितीन जोशी यास सांगितली असता त्यांनी नितीनचा मित्र शिवा पाटील यांना सांगितली व शिवा पाटील यांनी सांगितले की माझाच साला आहे आम्हीहि त्यांचासाठीही मुलगीच पाहत आहोत.
  मुलगा निर्व्यसनी, घरी 8 ते 10 एकर शेती कष्टाळू व शांत स्वभावाचा, मुलाचा फोटो शिवाभाऊ यांनी नितीन भाऊंना मोबाईल वर पाठवला, नितीन भाऊंनी फोटो पुढे पाठवला दोघांच्या घरच्यांना पसंती झाल्यावर मुलगी पाहण्याची तारीख ठरवली ती 04/12/ 2021 मुलगी पाहण्यासाठी निघाले व अकोल्यात पोहचले मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला सगळ्या गोष्टीची विचारपूस झाली आणि शेवटी अकोला येथील सालासार बालाजी मंदिर येथे मोजक्याच पाहुण्यांच्या व वकील, पत्रकार ( संपादक ) मंडळीच्या उपस्थितीत देवासमोर एकमेकांच्या गळ्यात फुलहार घालून विवाह संपन्न झाला.
 वर कडील मंडळी त्यांच्या परंपरेने व कुलदेवतेचे कार्यक्रम करून दिनांक 07/12/2021 रोजी विवाह सोहळा स्वखर्चाने पार पाडणार आहेत...


  आज वर कडील मंडळींनी वधू माता पित्यांना कुठल्याच प्रकारचा खर्च करू न देता आदर्श विवाह समाजात पार पाडला...

वर :-  अशोक चैत्राम शेवाळे व
वधू :- प्रगती अरुण रोकडे यांना उपस्थित पाहुणे मंडळींनी,आई, मावशी, मामा व इतर नातेवाईकांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या ...

Post a Comment

2 Comments

  1. अभिनंदन अभिनंदन ❤️❤️❤️👌👌👌😍😍😍

    ReplyDelete
  2. अभिनंदन
    जय आझाद नायक न्युज

    ReplyDelete