जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुंधवत व शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुनील भाबड यांनी मृत तरूण महिलेचा अंगावरील टॅटू व हातावरील नावावरुन तपासाचे चक्र फिरवीत ४८ तासात ओळख पटवून आरोपीला दिडोंली गुजरात येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. मृत तरूणी विधवेचा भाऊ यांने शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्यादीत म्हटले आहे की, गौरव अनिल पाटील (वय २२, व्यवसाय - खासगी नोकरी रा. रॉयल स्टार्क टाऊन- सी रामी पार्क, दिंडोली सुरत गुजरात) दोन महिन्यापूर्वी मेहुणे संदीप कैलास पाटील यांचा मृत्यू झाल्याने बहीण रुपाली ऊर्फ माया पाटील ही तिचा मुलगा जयेश व मुलगी साक्षी यांच्यासह घरी राहत होती. रुपाली ही सुरत येथील कनिष्ठा डायमंड या कंपनीत खासगी नोकरी करित होती. रुपाली हिचे मनोज पाटील (मुळ, रा तावखेडा प्र.बेटावद, ता.शिंदखेडा व हल्ली मुक्काम दिडोंली, सुरत गुजरात) यांच्याशी चार वर्षापासून प्रेम संबंध होते. त्यांच्या सोबत नेहमी जात येत असे. मनोजशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो संबंध तोडत नव्हता.
जिवे ठार मारेल अशा धमक्या देत होता रुपाली हिस मनोज पाटील नंदुरबार येथे प्लॉट घेवून देणार असून वीस हजार रोख देणार आहे. त्यामुळे त्याच्या सोबत जाते असे सांगितले. ६ ऑक्टोबरला दिडोंली सुरत पोलिस ठाण्यात रूपाली हरवल्या बाबत तक्रार देण्यात आली. रुपाली पाटील हीचा शिंदखेडा पोलिस ठाणे हद्दीत मृतदेह सापडला आहे. रुपाली हिचा मृत्यूदेह शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन रूम मध्ये शव पेटीत ओळख पटविण्यासाठी राखून ठेवला होता. रुपाली हिचे ओळख व खात्री झाली. मनोज पाटील यांने रुपाली हिस नंदुरबार येथे प्लॉट घेण्याचे आमिष दाखवून रुपाली ऊर्फ माया संदीप पाटील हिला जिवे ठार मारले आहे. याबाबत मनोज पाटील यांच्या विरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी त्याला शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुनील भाबड यांनी हजर केले आसता न्यायाधीश संतोष वैद्य यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
0 Comments