
पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथकाने आज दिनांक २१/१०/२१ रोजी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू हद्दीतील ग्राम आपातापा येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली असता त्यामध्ये नामे १) प्रदीप शंकरराव आपोतीकर रा.आपत्ती खुर्द याचे पासून विदेशी दारू चे २५ कॉटर किंमत २.३५०/- ₹ रुपये चे मिळून आले तसेच दारू बाळगून असणारा इसम नामे २) प्रदीप नामदेव उमाळे वय 42 वर्ष रा. कौलखेड गोमासे याचे पासून देशी दारूचे 370 कॉटर किंमत ११,१००/-रु.अशी एकूण १३४५०/-रु.ची दारू मिळून आल्याने आरोपीचं विरुद्ध पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक ..जी श्रीधर साहेब,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख श्री विलास पाटील साहेब यांनी व त्यांचे पथकाने केली आहे.
0 Comments