दिनांक २१ आक्टोबर १९५९ रोजी लडाख भागात हॉटस्पींग येथुन ६ मैल पुर्वेला केद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी कडाक्याच्या थंडीमध्ये नेहमी प्रमाणे भारत तिबेट सिमेवर टेहाळणी करीत होती. त्यांच्यावर चिनी सैनिकांनी अचानक
अत्याधुनिक शस्त्रामधुन गोळयांचा वर्षाव सुरु केला. तेव्हा १९ जणांच्या पोलीस दलाच्या या तुकडीनी त्यांचा निकराने प्रतिकार केला त्यापैकी १० जवानांनी आपले प्राण अर्पण केले. त्यांची आठवण म्हणुन दरवर्षी २१ आक्टोबर रोजी मागील वर्षी संपुर्ण भारतात कर्तव्य करीत असतांना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना त्यांचे स्मृती प्रित्यर्थ या हुतात्मा स्मृती दिनानिमीत्त संपुर्ण भारतात प्रत्येक जिल्हयातील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी श्रध्दांजली अर्पण करण्यात येते.यावर्षी दिनांक.०१.०९.२०२० ते ३१.०८.२०२१ पर्यंत संपुर्ण
भारतातील सर्व पोलीस दलातील एकुण ३७७ पोलीस अधिकारी व पोलीस जवान यांनी आपले कर्तव्य बजावीत असतांना देशासाठी प्राण अर्पण केले आहे.
त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस मुख्यालया या मैदानावर स्मृतिदिन शहीद सलामी देऊन कृतज्ञता पूर्वक साजरा केला
0 Comments