Header Ads Widget

Responsive Image

शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे शहरातील कर्कश आवाज करणाऱ्या फटाके फोडणाऱ्या बुलेट वाहनांवर कारवाई

शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे शहरातील कर्कश आवाज करणाऱ्या फटाके फोडणाऱ्या बुलेट वाहनांवर कारवाई 


शहरात फिरणारे कर्कश्य आवाज करणारे वाहनांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण मुळे शहरातील रुग्ण, वरिष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना तसेच इतर वाहन धारकांना असहनीय त्रास सहन करावा लागत आहे.

 काही वाहनधारक आपल्या वाहनाचे सायलेन्सर मॉडिफाइड करून फटाके फोडणारे सायलेन्सरचा सर्रासपणे वापर करून ध्वनी प्रदूषण मध्ये वाढ करीत आहेत, ज्यामध्ये बुलेट वाहनाचे प्रमाण जास्त दिसून येत आहे ज्याचा नाहक त्रास सामान्य जनतेला सोसावा लागत आहे सदर बाबत शहरातील नागरिकां च्या तक्रारी शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथे प्राप्त होत आहेत.

तरी यापुढे कर्कश् आवाज करणारे वाहन तसेच फटाके फोडणारे बुलेट यांचेवर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत विशेष मोहीम राबवून यादरम्यान कायदेशीर कारवाई करून असे वाहन जप्त करण्यात येणार असल्याबाबत मा. पोलीस निरीक्षक विलास पाटील शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांनी सुचित केले आहे.          


                                                                                                                                                                                         
                              

Post a Comment

0 Comments