विशेष पथकाकडून अवैध दारूची विक्री करणाऱ्यावर धाड... दुचाकी सह देशी विदेशी दारू सह 58,060चा मुद्देमाल जप्त
आज दि, 22/10/21 रोजी विशेष पथक अकोला अवैध धंदे प्रतिबंध गस्ती वर असतांना खात्रिलायक खबर मिळाली की एका पांढऱ्या ऍक्टिव्हा वर देशी दारू विक्री करिता श्रीवास्तव चौका कडुन डाबकी गेट कडे नेणार आहे अश्या खात्री लायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन कामगार कल्याण केंद्रा समोर नाकाबंदी केली एक इसम एका पांढऱ्या ऍक्टिव्हा वर येतांना दिसला असता त्याला रोड च्या बाजूला गाडी घेण्यास सांगून त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव राजेश विष्णुपंत जोगळेकर वय 56रा. काला मारोती रोड, उर्दू शाळे जवळ जुने शहर अकोला असे सांगितले.. त्याच्या जवळील पांढऱ्या पोतडीची पाहणी केली असता त्यात एक पेटी देशी दारू सखू संत्रा कीं.2,880 अशी मिळून आली.. तसेच दुचाकी गाडी ऍक्टिव्हा MH 30 BE 8693 कीं. अं.40,000 असा एकूण 42,880रु. मुद्देमाल मिळून आला.. त्याचे हे कृत्य क.65 ई म.दा.अधी.अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन डाबकी रोड येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे..
तसेच रिधोरा येथील एका गायवाड्यात (गोठ्यात) एक इसम विना परवाना दारूची विक्री करीत आहे अश्या खात्रीलायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता तेथे देशी दारू चे 125नग,कीं 7500रु आणी विदेशी दारू मॅक डॉनल नंबर 1 चे 48 नग कीं 7860 रुपयेची एक पेटी असा एकूण 15,180 रु.चा मु्देमाल मिळून आला...
त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव गणेश रमेश सोळंके वय 31 रा. ग्राम रिधोरा अकोला असे सांगितले त्याचे हे कृत्य महा.दा.अधि.अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो.स्टेशन बाळापूर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे....
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री जी.श्रीधर साहेब, अप्पर पो. अधीक्षक एम.राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली पो.नि.विलास पाटील साहेब आणि पथकाने केली.
0 Comments