संज्योत फाऊंडेशन अकोला यांच्या विद्यमाने मागील काही महिन्यात बरेच से सामाजिक कार्यक्रम पार पडले परंतु यांनी पहिल्यांदा यांच्या तर्फे गुलजारपूरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये शासकीय महाविद्यालय तसेच बेकस्टर बेकरीचा सह सहभाग होता. तसेच समाजात असेलेले रक्तदान विषयीचा गैर समज दूर करण्यासाठी परिसरात नागरिकांना मध्ये रक्तदाना विषयी जनजागृती करण्यात आली. यामध्ये १५४ दात्यांनी रक्तदान केले. यात महिलांनी सुद्धा सहभाग घेतला.
कोरोनाची तिसरी लाटेचेचे भान असता तसेच सद्ध्या अकोल्यातील रक्तपेढ्या मधील असणारा रक्ताचा अल्पसाठा व तुटवडा ही बाब लक्षात घेता. संज्योत फाऊंडेशन, अकोला,यांनी जुने शहर गुलजारपुरा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असता नागरिकाचा भरपूर प्रतिसाद पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर महिला साठी रक्तदानविषयी जनजागृती चा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून रक्तदान सुरू करण्यात आले. संज्योत फाऊंडेशन तर्फे अश्या प्रकारचे उपक्रम भविष्यात ही ठेवण्यात येतील अशी त्यांनी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष अभिषेक कवाडे यांनी दिली. कार्यक्रमाच्या च्या प्रमुख पाहुनी नगरसेवक श्री अजय रामटेके , श्री प्रसन्न रत्नपारखी , डॉ श्री नरेंद्र सरोदे, नगरसेविका सौ. शीतल रामटेके ,सौ. वैशाली तिरपुडे, कु. श्र्वेतल चतारकर हे उपस्थित होते.
0 Comments