रामदास पेंडकर तानूरकार
भावसार समाज सिडको नविन नांदेडच्या वतीने वटपौर्णिमे निमित्त श्री महादेव मंदिर, शाहूनगर ,हडको ,नवीन नांदेड येथे महाआरतीचे व वटवृक्षाचे वृक्षारोपणचे कार्यक्रम संपन्न . सचिन पेठकर यांनी सपत्नीक केले पुजन व आरती
भावसार समाज सिडको नवीन नांदेड चे अध्यक्ष विनोद सुत्रावे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे नियोजन संजय पेठकर अध्यक्ष युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन सिडको नविन नांदेड यांनी केले,
यावेळी रामदास पेंडकर तानूरकर, अध्यक्ष भावसार सेना नांदेड यांनी आपले विचार मांडले की निसर्गताच दीर्घायुष्य असलेले वटवृक्ष यांची पूजा करून आपल्या पतीस आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो म्हणून वटवृक्षाची पूजा केली जाते.
दीर्घायुष्य वटवृक्ष पिंपळ,उंबर इत्यादी अनेक वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते याचे जतन व जोपासना केली पाहिजे असे ते म्हणाले.
आझाद नायक च्या कार्यकारी संपादक पदी निवड झाल्याबद्दल भावसार समाज सिडको नविन नांदेड वतीने रामदास पेंडकर तानुरकर यांचे सत्कार करण्यात आला,
सहसचिव विश्वानंद परळकर यांनी आभार प्रदर्शन केले तर राजू अंबेकर यांनी वट पौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी वटवृक्षचे रोपटे उपलब्ध करून दिले.
0 Comments