मुख्याधिकारी यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पकंज चौधरी यांचे निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
:- अमळनेर येथील शहराची ओळख असणारा दगडी दरवाजा चा बुरुज ढासळला होता.त्या पार्शवभूमीवर मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी पुरातत्व विभाग,जिल्हाधिकारी सो.,प्रांताधिकारी मुख्याधिकारी यांच्या कडे वेळो वेळी पाठपुरावा करून काम करण्यास भाग पाडले होते .परंतु पुन्हा सदर कामास हेतुपुरस्पर दिरंगाई होत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे त्यास अनुसरून आज दि.०४ रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
अमळनेर शहराला सदैव इतिहासाची साक्ष देणारा प्रेरणादायी दगडी दरवाजा सुमारे २ वर्षांपूर्वी कोसळला असून राजकीय खेळीमुळे की हेतुपुरस्पर दुर्लक्षा मुळे सुमारे ऑगस्ट २०२० पासून कार्य आरंभ करण्याचे आदेश देऊन देखील कामात आज पर्यंत कुठलीही विशेष प्रगती दिसत नाही.मागील काळात संबंधित ठेकेदार यांना फार मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले याची आम्हास जाणीव आहे. परंतु त्यावर काही तरी मार्ग काढणे आवश्यक असतांना देखील आपल्या विभागा मार्फत विशेष दुर्लक्ष केले जात आहे.आपल्या शहरात नगरपरिषद तर्फे काही कामे विना कार्यरंभ आदेशाची देखील होतात अशी जन सामान्य जनते मध्ये चर्चा आहे. आमच्या अमळनेरची शान असलेल्या दगडी दरवाजा चा कामाला कार्य आरंभ आदेश देऊन देखील आज पर्यंत पूर्ण होत नाही हा देखील विचार करण्याचा विषय आहे.
१० दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा
येणाऱ्या १० दिवसात जर युद्ध पातळीवर काम सुरू नाही झाले तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.! असे निवेदनात पंकज चौधरी यांनी म्हंटले आहे.
0 Comments