अकोला : खुल्या बाजारात विक्रीवर बंदी असलेल्या ऑक्सीटोजिन इंजेक्शनची अवैधरित्या भावाने विक्री करण्याचा गोरख धंदयाचा अकोला पोलीसांच्या दहशत वादी विरोधी पथकाने आज गुरुवारी पर्दाफाश केला. सिंधी कैंप परिसरात ही कार्रवाई करीत 10,67,500 रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली. प्रतिबंधित व आरोग्यास अपाय कारक असलेल्या ऑक्सीटोनीस इंजेक्शन ची खदान परिसरात मोठ्या प्रमाणात जास्त दराने विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांना मिळाली त्यांच्या मार्गदर्शना खाली दहशतवादी पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने माहितीची पडताळणी करून त्यांनी खदान परिसरा तील कच्ची खोली येथील जयप्रकाश कलाचंद मोटवानी (50) याच्या घरी छापा टाकला. या वेळी 10बॉक्समध्ये ऑक्सीटोन इंजेक्शनच्या 2135 बॉटल आढळून आल्या.
सदर साठा ताब्यात घेऊन जयप्रकाश मोटवानी व कमल शर्मा (रा. गया बिहार )या दोघांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात कलम 175, 274, 275, 34, 18(अ) 18(क)व सौंदर्यप्रसाधन कायदा 1940 च्या कलम 27(ब) 27(ड) 28 व 105 नुसार गुन्हा दाखल केला असून जयप्रकाश मोटवानीला अटक केली तर कमल शर्मा (रा. गया बिहार )फरार झाला.
Follow this link to join my WhatsApp group: -https://chat.whatsapp.com/FDycT3MOZg488UKgiifnRw
0 Comments