अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, अकोला व मुस्कान पथक,स्था. गु. शा. अकोला यानी संयुक्तपणे पो. स्टे. उरळ येथील मिसिंग उघडकीस
अकोला : जिल्हयामध्ये मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर तसेच अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३. ३६६ (अ) भादंवि तसेच महीला मिसींग चा तपास करत आहे . अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने मागील महीन्यापासुन आज पावेतो एकुण १२ गन्हे व ३ मिसिंग उघडकीस आणले आहेत दिनांक. ०३/०४/२०२१ रोजी पो स्टे उरळ येथे गायगाव येथील फिर्यादी यांनी त्यांची मुलगी ही कुणाला काहीही न सांगता घरातुन निघुन गेली म्हणुन मिसिंग नं.१२/२१ दाखल केली होती पोलिस
अधिक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला व मुस्कान पथक .स्था गु.शा.अकोला यानी संयुक्तपणे मिसिंग चा तपास केला दिनांक ०९ /०६ /२०२१ रोजी मिसिंगमधील मिसिंग मुलगी पंचगव्हाण येथे असल्याची गुप्त बातमीदारांमार्फत माहीती मिळाल्याने लागलीच अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे अधिकारी यांनी मिसिंग मुलगी हीचा शोध घेऊन ताब्यात घेतले त्यांनंतर अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, अकोला येथे आणुन मिसिंग मुलीला विश्वासात घेऊन विचारपुस करुन पुढील कार्यवाही कामी पो स्टे उरळ ला रितसर ताब्यात देण्यात आले पोलीस अधिक्षक जी श्रीधर तसेच अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली उपरोक्त कामगिरी ही पो नि श्री संजीव राऊत, सपोनि प्रिती ताठे, सपोनि महेश गावंडे.पोउपनि सुलभा ढोले . अंमलदार सपोउनि विजय खर्चे पोहेकॉ सुरज मंगरुळकर, मपाका पुनम बचे तसेच मुस्कान पथक स्थागुशा पोहेकॉ प्रविण लाड. मपोकॉ पुजा इंदोरे.अनिता टेकाम यांनी केली असुन.
लवकरच जिल्हयातील इतर प्रलंबित मिसिंगमध्ये व गुन्हयांमध्ये सूदधा तत्परतेने पिडीत मुलगी व आरोपी यांचा शोध घेऊन गुन्हयांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला करित आहे.
0 Comments