राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी नगर खुशालीकुंज येथे आशा सेविका यांना साडी चोळी देवुन सत्कार करण्यात आला.
अडगाव बु!प्रतिनिधी: सौ.खुशाली निमकडेॅ
शिवाजी नगर खुशालीकुंज येथे आशा सेविका प्रदेशाध्यक्ष ईश्वरजी बाळबुधे यांच्या आदेशानुसार, जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे,आमदार अमोलदादा मिटकरी, ओबीसी सेल निरीक्षक राजूभाऊ गुल्हाने, प्रदेश सरचिटणीस सदाशिवराव शेळके, ओबीसी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे,ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष सौ.सुषमाताई कावरे तेल्हारा तालुका ओ.बी.सी.सेलच्या अध्यक्षा प्रितीताई सिञे,तालुका अध्यक्ष प्रदिपदादा ढोले. यांच्या मार्गदर्शनाखाली राष्टवादी काॅग्रेस पार्टीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राष्टवादी काॅग्रेस पार्टीच्या ओ.बी .सी.सेलच्या राष्टवादी काॅग्रेस पार्टीच्या तालुका तेल्हारा महासचिव सौ.खुशालीताई निमकडेॅ यांच्या स्वयंपुर्तीने आशा सेविका यांना साडी चोडी देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्टवादी काॅग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्या.सौ.गायञी चिम सरपंच, सुलभाताई कुळकर्णी,सौ.रुचीता तायडे, सौ.सविताताई देऊळकार,सौ.राधाताई आसोले,सौ.अर्चनाताई भोपळे, सौ.ज्योतीताई निमकडेॅ,सौ.योगीताताई चोपडे तसेच आशा सेविका सौ.सुनीताताई भटकर,सौ.रेखाताई भोपळे,सौ.संगीताताई निमकडेॅ,सौ.उज्वलाताई पवार इत्यादी उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम निमकडेॅ व आभार प्रदर्शन खुशाली निमकडेॅ यांनी केले.
0 Comments