Header Ads Widget

Responsive Image

दगडी दरवाजा पुनर्निर्माण समितीचा पानंखिडकी भागातुन सुरु होईल आंदोलन


अखेर दगडी दरवाजा साठी समिती गठीत
विविध विषयावर झाली चर्चा व समिती 

आज दि 17/06/2021 रोजी जेष्ठ सदस्य बाबासो मुकुंद विसपुते, विरोधी पक्ष गटनेते बबलीभाऊ पाठक,माजी उपनगराध्यक्ष गोपीभाऊ कासार, सौ. जयश्री दाभाडे, राजेंद्रजी पोतदार, बाळासाहेब संदानशिव, नाविदभाई शेख, पंकजभाऊ चौधरी , अक्षयभाऊ अग्रवाल,परागभाऊ चौधरी पंकज भावसार,आदींसह बैठक पार पडली.बैठकीत आंदोलन करताना समिती गठीत करावी अशी सदस्यांनी सूचना मांडली. त्यास अनुसरून " दगडी दरवाजा पुनर्निर्माण समिती " नाव निश्चित करून समितीची घोषणा करण्यात आली.
तसेच खालील प्रमाणे आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली.

1) 17/06/2021 वार गुरुवार पानखिडकी ते दगडी दरवाजा पर्यँत दुकानावर व घरांवर काळे झेंडे लावणे ( दुपारी 2 वा.)

2) 18/06/2021 वार शुक्रवार रोजी व्यापारी बांधव व जास्तीत जास्त नागरिकांनि काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करणे.

3) 19/06/2021 वार शनिवार रोजी दगडी दरवाजा जवळ सकाळी 9 ते 12 पर्यत घंटानाद व थाळीनाद

4) 20/06/2021 वार रविवार रोजी बैठक व चर्चा करणे.

5) 21/06/2021 वार सोमवार रोजी इच्छापूर्ती देवी मंदिर , पानखिडकी येथे आरती करून ढोल वाजवत नगरपरिषदेत जाऊन नगराध्यक्ष यांना स्मरण पत्र व नगराध्यक्ष यांचा निवसाचा बाहेर ढोल वाजवणे

6) खासदार,आमदार,नगराध्यक्ष,जिल्हाधिकारी यांना निवेदन (मुख्यमंत्री ,गृहमंत्रीयांना निवेदन पाठवणे)

अशी रूपरेषा निश्चित करण्यात आले ल आहे.


समिती चा कार्यात इच्छुक सदस्यांनी स्वताहून सहभागी व्हावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments