अडगाव बु.प्रतीनीधी सौ.खुशाली निमकडेॅ
महाराष्ट्र शासन कृषी विभागा तालुका कृषि अधिकारी कार्यालय तेल्हारा यांचेद्वारे सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीकरिता विविध सभा आणि मार्गदर्शन सत्रामधून शेतकऱ्यांनी बी बी एफ वर पेरणी करावी असे आवाहन करण्यात आलेले होते त्याचअनुषंगाने अडगाव बु.येथील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे
परिसरात चांगला पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीस सुरवात करण्यात आलेली आहे.तेल्हारा तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पेरणीकरिता निशुल्क बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.सदर बीबीएफ द्वारे श्री उमेशकुमार राहटे यांच्या शेतात पेरणी करण्यात आली.
यावेळी मंडळ कृषि अधिकारी गौरव राऊत यांनीउपस्थित शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणी द्वारे होणारे फायदे, पेरणी पद्धत, सोयाबीन बिजप्रक्रिया आणि इतर कृषिविषय मार्गदर्शन केले.
कृषि विभागामार्फत बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरात बीबीएफ वरील सोयाबीन क्षेत्र वाढण्या करिता वाव आहे.
यावेळी शिवाजीनगर चे तलाठी श्री रसाळे साहेब श्री सारभुकणसाहेब कृषीसाय्यक, संतोष मुळे कृषी सहाय्यक,व पुरुषोत्तम भाऊ निमकर्डे अध्यक्ष पत्रकार संघ अध्यक्ष आडगाव, प्रकाश भाऊ राखोंडे,मंगेश रहाटे गजानन निमकर्डे,सुरेन्द्र सिंह ठाकूर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
0 Comments