जळगाव जिल्ह्यातील व अंमळनेर तालुक्यातील बातम्यासाठी आझाद नायक प्रतिनिधी पंकज भावसार
जळगाव:- पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान 2020-21 अतंर्गत जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाने निवड केल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सत्कार युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील यांनी केला.
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियाना तंर्गत सन 2020-21 मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वांवर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची 2 ऑक्टोबर, 2020 ते 31 मार्च, 2021 या कालावधीत पाच गटात स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ पर्यावरण दिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोड,पर्यावरण विभागा च्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर या मान्यवरांच्या उपस्थिती त ऑनलाईन पार पडला. याचे औचित्य साधत जळगाव जिल्हा युवक काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गोसावी उपस्थित होते.
0 Comments