सौ.खुशाली निमकडेॅ प्रतिनिधी आडगांव बु
महाराष्ट्र राज्य आशा सेविका व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्या मंजूर न झाल्यास मंगळवार दिनांक 15/6/21 पासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.... कृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दररोज 7 ते 8 तास काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेमध्ये कायम करावे.आशा सेविकांना सर्व सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्यात याव्यात,या मागण्या पुर्ण होईपर्यंत आशा सेविकांना दरमहा 18000,व गटप्रवर्तकांना 22000 वेतन देण्यात यावे.तसेच ठरवून दिलेले भत्ते देण्यात यावे.आशा सेविकांना व गटप्रवर्तकांना दरमहा कायम व निश्चित स्वरूपाची केलेली वाढ त्वरीत देण्यात यावी.आशा व गटप्रवर्तकांना व कुटुंबियांना आरोग्य सेवा मोफत द्यावी.आरोग्य विभागात 50 टक्के आरक्षण देण्यात यावे .
आशा सेविकांना आरोग्य विषयक सर्व साहित्य देण्यात यावे अशा विविध शासन दरबारी निवेदन दिले असून या मागण्या मंजूर न झाल्यास मंगळवार दिनांक 15/6/21 पासून सर्व आशा व गटप्रवर्तक बेमुदत संपावर जातील याची नोंद घ्यावी.याबाबतीत आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एन के चव्हाण यांचे कडे निवेदन सादर केले आहे.
0 Comments