शेतकरी संघटनेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक
आडगांव बु!प्रतिनिधी सौ.खुशाली निमकडेॅ
शेतकरी संघटनेच्या वतीने आज कसाईवाडा शेत अडगाव खुर्द येथे ठरल्याप्रमाणे किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन संपन्न झाले....आज सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या एच टी बि टी व इतर बियाणे यांच्या संबंधीत माहिती व प्रसारण केंद्राचे उद्घाटन पोलिसांचेबंदोबस्ता मुळे तब्बल चार तास उशिराने करण्यात आले.राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ललीत बहाळे यांचे हस्ते व माहिती तंत्रज्ञान आघाडी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार यांचे प्रमुख उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले.पोलिसांनी सकाळी तीन कार्यकर्त्यांना ताब्यातघेतल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष ललीत बहाळे यांचे नेतृत्वाखाली शेतकरी संघटने च्या कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन नारे देत उद्घाटन स्थळी प्रवेश केला त्यावेळी पोलिसांनी शेतकरी संघटनेचे फलक जप्त केले त्यानंतर माहिती व प्रसारण केंद्राच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी शेतकरी संघटने च्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक एच टी बि टी बियाण्यांची पेरणी केली. फलक अनावरण व प्रतिकात्मक एच टी बि टी बियाणे पेरणी बाबत कृषी विभागाच्यावतीने कोणतीही ॲक्शन घेण्यात आली नाही. शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून पोलिस विभागाने शेतकरी संघटनेचे ललीत बहाळे,लक्ष्मीकांत कौठकार,सतिश देशमुख विलास ताथोड,निलेश नेमाडे, दिनेश देऊळकार,दादाभाऊ टोहरे,दिलीप वानखडे मोहन खिरोडकार,संजय ढोकणे,जाफरखॉ आकाश देउळकार,अजित कळसकर, गोपाल निमकर्डे, दिनेश गिर्हे या कार्यकर्त्यां ना कलम 68 नुसार ताब्यात घेऊन कलम 69 नुसार सोडून देण्यात आले.घटनास्थळी सकाळ पासून तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे,पं स कृषी अधिकारी विठ्ठल थुल,अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड ,हिवरखेड ठाणेदार धिरज चव्हाण, पोलिस पाटील हितेश हागे,व फार मोठ्या प्रमाणात पोलिस तसेच आर. सी. पी. चा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी व शांतता व सुव्यवस्थेकरीता पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कृषी विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येईल ... ज्ञानोबा फड अकोट ग्रामीण ठाणेदार
सुशांत शिंदे तालुका कृषी अधिकारी अकोट
आज रोजी एच टी बि टी हे बेकायदेशीर आहे.त्याला शासनाकडून मान्यता देण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी एच टी बि टी हे वाण पेरु नये
0 Comments