मुकेश भावसार,तेजस भावसार
भोंदु बाबा बुवांना थारा न देण्याची भावसार महिला मंडळाने घेतली सामुहिक शपथ
धुळे, येथील भावसार समाज महिला मंडळाच्या भगिनींनी चैत्रगौरी कार्यक्रम प्रसंगी वैज्ञानिक दृष्टिकोण ठेवून, कोणत्याही अंधश्रद्धा, भोंदु बाबा बुवांना थारा न देण्याची सामुहिक शपथ घेतली.
देशभर गाजलेल्या नाशिक भोंदुबाबा प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम महिला मंडळ अध्यक्षा सौ. माधुरी योगेंद्र जुनागडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी महिला मंडळाचे कामकाज पारदर्शी व डिजिटल स्वरूपात करण्यासाठी मंडळाच्या बँक क्यु आर कोडचेही उद्घाटन करण्यात आले.
भावसार भवन येथे महिला मंडळा तर्फे आयोजित चैत्र - गौरी निमित्त हळदी -कुंकू कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला मंडळाने डिजीटल व्यवहारांकडे सुरुवात केली. जेष्ठ भगिनीं
सौ. लताबाई ईश्वरलाल भावसार,
सौ. कमल कांतीलाल भावसार,
सौ. मनिषा महेंद्र भावसार, अध्यक्षा सौ. माधुरी योगेंद्र जुनागडे, विश्वस्त
श्रीमती संगीता विजय भावसार, सचिव सौ.ललीता अशोक भावसार, सहसचिव, सौ.अलका सुभाष भावसार, व उपाध्यक्षा श्रीमती दिपीका राजेश भावसार, यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ भगिनी सौ. कमल कांतीलाल भावसार यांनी रु. १११/- ची प्रथम देणगी QR कोड द्वारे समर्पित केली.
या प्रसंगी महिला मंडळाने खान्देशी संस्कृतीचे वैशिष्ठ्य म्हणून अक्षय तृतीयाला होणा-या गौराईची आठवण आणि दुर्मिळ होत असलेली झोक्याची परंपरा जागृत केली.
यासोबतच महिला मंडळाच्या वतीने समाजातील भगिनींनी आपल्या परिसरात किंवा आजूबाजू ला दैनंदिन वाढत असलेल्या बाबा बुवांच्या भोंदूगिरी बाबत समाज जागृती अभियान करून, अशा बाबांविरोधात सामुहिक शपथ घेतली. या शपथेद्वारे महिलांनी अशा प्रकारच्या बाबांवर विश्वास न ठेवता त्यांचेकडे जाणा-या महिलांना परावृत्त करण्याचा निर्धार केला. समाजात यापुढे ही चांगले उपक्रम घेण्याबाबत उपस्थितांनी मार्गदर्शन केले.
0 Comments