बाल दिनानिमित्त बालकांची हक्क व अधिकार याबाबत जनजागृती साठी महिला व बालविकास विभागातर्फे स्वाक्षरी अभियान जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात आले.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्वाक्षरी करून अभियानाचा शुभारंभ केला. बालकांसाठी समाजात, परिसरात सुरक्षित, आनंददायी वातावरण निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बालकांचे हक्क, स्वातंत्र्य या मूल्यांची जपणूक करतानाच त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर, सुनील लाडुलकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments