गाय, गो-हे, कालवड असे एकुण २३ गोवंशाना दिले जिवनदान ०२ मालवाहू पिकअप वाहने व ०१ मोटर सायकल सह एकुण २३,७५,०००/ रूपयांचा मुद्देमाल जप्त अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाणे वाढत असल्याने मा.पोलीस अधिक्षक श्री.अर्चित चांडक साहेब यांनी आदेशित करून त्यास प्रतिबंध करणे बाबत सुचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा, अकोला चे प्रमुख श्री.शंकर शेळके यांनी स्वतः भल्या पहाटे दोन पथकासह सापळा रचुन नागपुर वरून समृध्दी महामार्ग वरून अकोला कडे येणारे ०२ पीकअप वाहने वेगवेगळ्या वेळेत महान मार्गे शहरात येत असतांना जुने शहर हद्दीत नाकाबंदी करून पकडण्यात आले.
यामध्ये पीक अप वाहन क. १) एम.एच. ३० बी.डी. ५६८६ २) एम.एच. ३१ एफ. सी. २४८९ ज्यामध्ये गाय, गो-हे, कालवड असे एकुण २३ गोवंश जातीचे जनावरे निर्दयतेने कोंबुन कत्तली साठी वाहतुक करतांना मिळून आल्याने त्यांची सुटका करून उपचार, देखरेख व संगोपणाकरिता आदर्श गौसेवा संस्था म्हैसपुर येथे दाखल करण्यात आले. गोवंश भरून नागपुर वरून आलेल्या पिकअप वाहनाना स्थानीक पोलीसांवर लक्ष ठेवुन वाहनाना मार्ग दाखविन्या करिता असलेला इसम यास त्याचे मोटर सायकल सह ताब्यात घेतले. इसम नामे १) सकलेन मुस्ताक मोहम्मद आरीफ कुरेशी वय २५ वर्ष, मच्छी मार्केट ताजनापेठ अकोला २) लोकनाथ मुन्नास्वामी पिल्ले वय २५ वर्ष, रा. कोळसा टाल, धोबी चौक, कामठी जि. नागपुर, व फरार. आरोपी नामे ३) गुल मोहम्मद शेख बाबु रा. वाशिम बायपास, अकोला ४) मोहम्मद अल्तमश मोहम्मद हबीब (कुरेशी) रा. मच्छी मार्केट, ताजनापेठ, अकोला यांचे विरुध्द पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदर गुन्हयातील जप्त २३ गोवंश जातीचे जनावरे एकुण कि. ५, ७५,०००/- रू तसेच गुन्हयात वापरण्यात आलेले वाहन पीक अपवाहन क. १) एम.एच. ३० बी. डी. ५६८६ कि.अं. ८, ५०, ०००/रु, २) पीकअप वाहन क्र. एम.एच. ३१ एफ. सी. २४८९ कि.अं. ८,५०,०००/रू व मोटर सायकल क. HP SHINE कंपणीची दुचाकी क्र. MH-30-BP-8072 कि.अं. १००००० /रू असा एकुण २३, ७५,०००/ रुपयांचा मुद्देमला जप्त करण्यात आला. यापुढे सुध्दा वरीष्ठांचे आदेशाने गोवंश जनावरे कत्तली करीता आणण्या-या टोळीवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. श्री शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण, ग्रेड पो.उप.नि. विनोद ठाकरे व पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराये, भास्कर धोत्रे, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे, श्रीकांत पातोंड, धिरज वानखडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर यांनी केली.
0 Comments