"रक्तदान म्हणजे जीवनदान"
हिरवा परिसर जीवन नवे, एक तरी झाड लावायलाच हवे. त्याचबरोबर रक्तदान हेच माझे कर्तव्य आहे.
हीच भावना आपल्या जीवनाचा आदर्श मानुन दिनांक 21/06/2025 रोजी डॉ.पूजा सुमित्रा रमाकांत खेतान यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही "सुमिरामा फाउंडेशन "द्वारे भव्य वृक्ष लागवड आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात रमाकांत जी खेतान यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.
या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरातून भरभरून सहकार्य मिळाले, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग लाभला अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते डॉ. पुजा रमाकांत खेतान, विशाल धांडे, आशिष खिल्लारे, प्रवीण भोरे, प्रवीण काळे, आकाश सोनोने, सोनू ठाकूर, विनोद इंगळे, सैय्यद जहीर, नंदकिशोर गावंडे, देवेंद्र तिवारी, सागर शिंदे,कीर्ती काळे,मीना लांडे, स्वाती बचे,श्रुती सदांशीव,अंजली अवस्थी, विशाखा बिंडा,अश्विनी काळे,शीतल राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. आमची संस्था अश्या प्रकारे नेहमीं अनेक मानवसेवेचे उपक्रम सतत आणि अथकपणे राबवते.
त्यामुळे आपण सर्वांनी सुध्दा आमच्या सोबत सहभागी होऊन देशसेवा व समाजसेवेच्या कार्यात सहभागी व्हावे.
असे आवाहन डॉ. सुमित्रा खेतान यांनी केले.
0 Comments