अकोला :- आझाद नायक न्युज मुकेश भावसार
1 मे महाराष्ट्र दिवस तसेच कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यंदाही सुमिरमा फाउंडेशनने सर्व कामगार बंधू भगिनी साठी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये कामगार वर्गातील महिला पुरुष सोबतच त्यांच्या परिवारातील सदस्यांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषधी वितरीत करण्यात आले. यामध्ये पेन किलर, कॅल्शियम, टॉनिक, डोळ्यांचे ड्रॉप, अँलर्जी, सर्दी खोकला, बीपी, शुगर महिलांना सॅनिटरी पॅड सहित इतर आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या औषधी त्यांना देण्यात आल्या.
आणि या कार्याला यशस्वी करण्यात सुमिरमा टीमचे सदस्य अश्विनी परदेशी, कीर्ती काळे, श्रेया शर्मा, अश्विनी काळे, अँड. शीतल राऊत, आशिष खिल्लारे, अँड. विनोद इंगळे, प्रवीण भोरे, संजय ठोके, प्रवीण काळे, आनंद गाढे, नंदकिशोर गावंडे, विशाल धांडे, सागर शिंदे, सतपाल इलालकर, संतोष वक्ते, आदींचे योगदान लाभले.
0 Comments