पारोळा (प्रतिनिधी) -
पारोळा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ निवडणुकीसाठी आज दिनांक १३ रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरातील नगरपालिकेच्या सार्वत्रिक २०२२ निवडणुकीसाठी आज नगरपालिकेच्या सभागृहात पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी विक्रम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यात प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ९ या प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
यावेळी पारोळा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, सन २०११ च्या जनगणनेनुसार शहरातील मतदारांची संख्या ही ३७६६६ असुन शहरात २४ प्रभाग आहेत. यात १२ पुरुष तर १२ महिला असे नगरसेवक असतील. यावेळी नगरपालिकेच्या सभागृहात उपस्थित असलेली लहान मुलगी गौतमी मोरे हिच्या हातुन सोडतीची चिठ्ठी काढण्यात आली.
यात प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये अनुसूचित जाती महिला राखीव तर ब सर्वसाधारण राहाणार आहे. तर प्रभाग क्रमांक ९ अ हा अनुसूचित जाती महिला राखीव तर ब सर्वसाधारण अशी सोडत चिठ्ठी द्वारे निघाली.
सर्व प्रभागांचे आरक्षण पुढील प्रमाणे..
प्रभाग क्रमांक १) अ, एस, सी महिला,
ब, सर्वसाधारण
प्र. क्रमांक २) अ, सर्व साधारण महिला ब, सर्वसाधारण
प्र. क्रमांक ३) अ,सर्व साधारण महिला
ब,सर्वसाधारण
प्र. क्रमांक ४) अ , सर्व साधारण महिला
ब , सर्वसाधारण
प्र. क्रमांक ५) अ, सर्व साधारण महिला
ब, सर्वसाधारण
प्र. क्रमांक ६) अ, सर्व साधारण महिला
ब, सर्वसाधारण
प्र. क्रमांक ७) अ सर्व साधारण महिला ब सर्वसाधारण
प्र. क्रमांक ८) अ, सर्व साधारण महिला
ब, सर्वसाधारण
प्र. क्रमांक ९) अ, सर्व साधारण महिला ब, एस.टी.सर्वसाधारण
प्र. क्रमांक १०) अ, सर्व साधारण महिला ब, सर्वसाधारण
प्र. क्रमांक ११) अ, सर्व साधारण महिला
ब, सर्वसाधारण
प्र. क्रमांक १२) अ, सर्व साधारण महिला ब, सर्वसाधारण
याप्रकारे आरक्षण आज पारोळा नगर पालिकेच्या सभागृहात काढण्यात आले.
याप्रसंगी नगरपालिका सभागृहात उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, कैलास पाटील, आजी माजी नगरसेवक व नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक संघमित्रा सदानशिव, लिपिक सुभाष थोरात, हिम्मत पाटील व नगर पालिका कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments