Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर शहरात चोरीचे प्रमाण वाढले.. चोरीच्या गुन्ह्यात बाप व मुलाला अटक...

अमळनेर-आझाद नायक न्यूज,       विक्की भावसार,
अमळनेर शहरातील भालेराव नगरात असलेल्या एका घराच्या कपाटातून सोन्याचे दागिने अंदाजे रक्कम एकुण ६७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कविता गणेश बोरसे रा. भालेराव नगर, धुळे रोड, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ एप्रिल रोजी त्यांच्या घरातील कपाटातून दिनेश भावसार आणि त्याचा मुलगा आदित्य दिनेश भावसार दोन्ही रा.भालेराव नगर, अमळनेर,यांनी सोन्याचे तुकडे, सोन्याची अंगठी असा एकुण ६७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात दिनेश भावसार आणि आदित्य दिनेश भावसार  यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.

Post a Comment

0 Comments