सध्या अमळनेर मध्ये अवैध धंदे फार फोफावले आहेत त्यातच लूटमारी, चोऱ्याचे प्रमाण देखील वाढले आहे अशीच घटना अमळनेर मधील न्यू प्लॉट भागात घडली.
सविस्तर वृत्त असे की शहरातील न्यू प्लॉट भागातून पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यानीं चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
या संदर्भात सोमवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ :०० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजनाबाई साहेबराव पाटील वय-७७ वर्ष,रा.पिंपळे खुर्द ता.अमळनेर या वृद्ध महिला सोमवार १० एप्रिल रोजी शहरातील राणे झेरॉक्स दुकानाच्या गल्लीतून पायी जात होत्या. त्यावेळी अज्ञात दोन जणांनी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. या संदर्भात वृद्ध महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात दोन भामट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहे.
0 Comments