अकोला- गुलाम मोहसीन
संपूर्ण जग हे निरामय आरोग्यासाठी योगा कडे वळत चालले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने भारताच्या पाठपुराव्यामुळे जागतिक योग दिन ही घोषित केला आहे. राष्ट्रातील पतंजली योग समितीच्या वतीने पू. गुरुदेव रामदेवबाबा यांच्या कुशल मार्गदर्शनात पतंजली योग समिती संपूर्ण जगात योग प्राणायामचा प्रसार करीत आहे. या अनुषंगाने महानगरा तील सिंधू सीनियर सिटीजन असो. पतंजली परिवारच्या सहकार्याने आता महानगरात सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित करीत असल्याची माहिती सिंधू सीनियर सिटीजनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्थानीय सिंधी कॅम्प येथे आयोजित या पत्रकार परिषदेत यावेळी पतंजली योग परिवाराचे सुहास काटे, हरीश माखिजा, राजेश खांबलकर, कपिल लाड, भेरूमल वादवानी, पंचायतचे अध्यक्ष कन्हैयालाल रंगवानी, दिलीप गोयनका, कोडूमल चावला, हरीश पारवानी, भगतराम देवानी, गोपालदास कटारिया, गिरधर टकरानी. अनिल गवई, नंदलाल टकरांनी आदी उपस्थित होते. पतंजली योग परिवाराच्या वतीने होणार सहयोग शिबीर.
0 Comments