Header Ads Widget

Responsive Image

जागेच्या जुन्या वादातून शिवसेचे दोन्ही गट ( शिंदे - ठाकरे ) आपसात भिडले....पोलीस हवालदारही झाले जखमी


अकोला :- मुकेश भावसार, गुलाम मोहसीन


जागेच्या जुन्या वादातून शिवसेचे दोन्ही गट ( शिंदे - ठाकरे ) आपसात भिडले....

अकोला :- शिवसेना ठाकरे गटाचे महानगराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्यावर जमिनीच्या वादावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोन गटात हाणामारीही झाली. राजेश मिश्रा यांना गंभीर दुखापत झाली, तर विरोधी गटातील काही जण जखमी झाले.
शहरातील हरिहर पेठ भागात रविवारी दोन गटात हाणामारी झाली.

जुने शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा आणि प्रवीण अहीर गटात जमिनीच्या वादा तून हाणामारी झाली. यात राजेश मिश्रा यांच्या नाकाला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असून अन्य एक जण जखमी झाला आहे. अहीर गटातील दोन ते तीन लोक जखमी झालेत. हाणामारीत पोलीस हवालदार शेख रशीद यांच्या डोक्यावर लाठी बसली, तर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचा चष्माही तुटला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच ते सहा लोकांना ताब्यात घेतले आहे. मिश्रा यांनी २०१९ मध्ये हरिहर पेठ येथील जागा विकत घेतली. त्यावर कुटुंब भाड्याने राहत होते. त्या जागेवर न्यायालयाच्या आदेशाने मिश्रा यांना ताबा मिळाला. या प्रकरणावरून मिश्रा व अहीर कुटुंबात वाद आहे. या वादाचे पर्यवसान आज हाणामारीत झाले. प्रवीण अहीर, कमलेश अहीर, सचिन अहीर, विजय अहीर आणि त्यांची आई शांता अहीर यांनी संगणमत करून शिवीगाळ करून जीवाने मारण्याच्या उद्देशाने तलवारीने वार केल्याची तक्रार मिश्रा यांनी दिली, तर अहीर कुटुंबानेदेखील मिश्राविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment

0 Comments