अकोला :- मुकेश भावसार
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील बोरगाव वैराळे गावचे भुमिपुत्र थोर स्वातंत्र्य सैनिक दैनिक देशोन्नतीचे संस्थापक संपादक स्व. खासदार मधुसुदन ऊर्फ नानासाहेब वैराळे यांच्या जयंती उत्साहाचे उद्घाटन दि ११ नोव्हेंबर २०२२ शुक्रवारी सकाळी ११ वाजता शिक्षक आमदार अॅड किरण सरनाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे.
गाव कचरा मुक्त व्हावे यासाठी ग्रामपंचायत बोरगाव वैराळे प्लास्टिक कचरा कुंडीचे वाटप करण्यात येणार आहे.
बोरगाव वैराळे येथील स्वातंत्र्य सैनिक मधुसुदन ऊर्फ नानासाहेब वैराळे स्मारक समितीच्या वतीने मागील वीस वर्षापासून स्वातंत्र्य सैनिक स्व.नाना साहेब वैराळे यांच्या जयंती निमित्त दरवर्षी विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असते त्याप्रमाणे यावर्षी देखील येथील ग्रामपंचायत ने प्रत्येक घरी कचराकुंडी भेट देऊन गाव स्वच्छ व कचरा मुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमांचा शुभारंभ स्वातंत्र्य सैनिक नानासाहेब वैराळे यांच्या जयंतीच्या दिवशी आम.अॅड किरण सरनाईक यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन हे उपस्थित राहणार आहेत .
तरी परिसरातील जनतेने बोरगाव वैराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थितीत रहावे असे आवाहन स्मारक समिती, ग्रामपंचायत, शिक्षण समिती व समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments