Header Ads Widget

Responsive Image

धुळ्यातील प्रसिद्ध गुरूद्वारात गुरूनानक देवजी जयंती उत्साहात

धुळ्यातील प्रसिद्ध गुरूद्वारात गुरूनानक देवजी जयंती उत्साहात.

वृत्त प्रतिनिधी-: धनंजय गाळणकर

धुळे दि.८ नोहेंबर-: शीख पंथाचे धर्मगुरू श्री गुरुनानक देवजी महाराज यांचा 554 वा प्रकाश उत्सव आज रोजी धुळे येथील गुरुद्वारा नानक साहेबजी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात झाला.

यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमां मध्ये समाजातील सर्व थरातील लोकांनी सहभाग नोंदविला.


धुळे येथील गुरुद्वारा गुरुनानक साहेब जी येथे सहा नोव्हेंबर पासून श्री. गुरुनानक देव जी महाराज यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त श्री.अखंड पाठ सुरू होता.या अखंड पाठाची समाप्ती आज झाली. या कार्यक्रमाला अमृतसर येथील अकाल तख्त साहेबचे मुख्य ग्रंथी गुरुमुखसिंग हे प्रामुख्याने त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते तसेच अन्य गुरुद्वारातील नामवंत मुखी,रागी जत्थेदार यांची उपस्थिती होती.अशी माहिती धुळे गुरुद्वाराचे मुख्य संत बाबा धीरज सिंगजी यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 1:00 वाजता अरदास झाल्या नंतर लंगर अर्थात अखंड महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम सुरू झाल. याशिवाय दिवसभर कीर्तन, दिवान, भजन,पुष्पवृष्टी(फुलांचीउधळण) आणि फटाक्यांची आतषबाजी असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

सदरच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जलज शर्मा,सौ.शर्मा उपस्थित होते.बाबा धिरजसिंग यांनी त्यांचा शाल व सरोपा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वधर्मीय नागरीक  विविध धर्म पंथातील धर्मप्रेमी तसेच शिख बांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments