Header Ads Widget

Responsive Image

दादासाहेब जेष्ठ नागरिक संघाला कौटुंबीक छळवादावर समजोता घडविण्यात यश.

दादासाहेब जेष्ठ नागरिक संघाला कौटुंबीक छळवादावर समजोता घडविण्यात यश.

दोंडाईचा :-  दि.२५ नोव्हेंबर . -
येथील रावल जेष्ठ नागरिक संघात मुलगा व सून यांच्या कडून शाररिक व मानसिक छळ केला जातो. अशी तक्रार जेष्ठ नागरिक श्री.रघुनाथ सुकलाल पाटील यांनी केली होती.
सदर तक्रारीचे निराकरण आणि समजोता चर्चेव्दारे घडवून आणण्यात दादासाहेब जेष्ठ नागरिक संघाला यश आले आहे. ज्या मुलगा व सुनबाई विरोधात तक्रार केली होती. त्यांना व त्यांच्या संबंधीत नातेवाईकांना दादासाहेब जेष्ठ नागरिक संस्थेच्या कार्यालयात दि. २०/११/२०१२ रोजी बोलविण्यात आले होते. येथील "आई-वडील आणि जेष्ठ नागरिक कल्याण संस्थेचे" अध्यक्ष श्री.बारकू पाटील आणि दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.पी. गिरासे यांच्या पुढाकाराने तक्रारदार श्री.रघुनाथ पाटील आणि ज्यांच्या विरोधात प्रकार होती ते मुलगा व सून बाईना समुपदेशन करण्यात आले. आणि समुपदेशन व्दारे खेळी मेळीचा वातावरणात समजोता घडून आला. सदर समझोता घडवून आणण्या साठी दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघाचे विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष सुरेश निंबाजी चौधरी, सदस्य कुकरेजा गुरुजी, प्रा. सदाशिव शेजोळे सर यांचे विशेष योगदान लाभले.
क्लिष्ट तक्रार असूनही सुंदर समजोता अत्यंत खेळीमेळीचा वातावरणात झाल्यामुळे जेष्ठ उद्योगपती तथा दोंडाईचा संस्थांनचे अधिपती श्रीमंत सरकारसाहेब रावल यांनी "दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारींचे मनपुर्वक अभिनंदन केले आहे. संबंधीतांचे सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments