धुळ्यातील कर्तृत्ववान धाडसी महिला श्रीमती प्रभाजी परदेशी यांचा सुषमा अंधारे यांच्या हस्ते जळगावात सन्मान संपन्न.
वृत्त प्रतिनिधी-: धनंजय गाळणकर
जळगाव दि.४ नोव्हेंबर . : महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या 'लोकमत'तर्फे खान्देशातील कर्तृत्ववान महिलांना महापौर सेवा अँचिव्हर्स अँवार्ड' देऊन गौरविण्यात आले.सदरच्या पुरस्कार सोहळ्यात धुळे शहरातील सुप्रसिद्ध
धाडसी महीला कार्यकर्त्या श्रीमती प्रभाताई परदेशी यांचा सुषमा अंधारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या पुरस्कारांचे शुक्रवार,४ नोव्हेंबर रोजी शिवसेना उ. बा. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या आहे. हस्ते वितरण करण्यात आले.शिवसेना उ. बा. ठाकरे गटाचे संजय सावंत,जळगाव मनपाचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन,यांची प्रमुख उपस्थिती होती.हा सोहळा केवळ निमंत्रितांसाठीच होता. सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस स्थानक जवळील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमती प्रभाजी परदेशी यांनी कधीही स्वार्थ साधलेला नसून त्यांनी नेहमीच जनसामान्यांचा आवाज बुलंद ठेवलेला आहे.त्यांच्या सातत्य प्रयत्नातून विधवा,परितक्ता असाह्य निराधार वृद्धांना जगण्याची आशा जीवंत ठेवली आहे.
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या 'लोकमत' तर्फे खान्देशातील कर्तृत्व वान महिलांना महापौर सेवा अँचिव्हर्स अँवार्ड' देऊन गौरविण्यात आले.व सदरच्या पुरस्कार सोहळ्यात धुळे शहरातील धाडसी महीला कार्यकर्त्या तथा उद्योजक श्रीमती प्रभाजी परदेशी यांना शिवसेने च्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मान झाल्याने त्यांच्यावर विवीध क्षेत्रातून व विवीध माध्यमातून कौतुक होत आहे.
0 Comments