अकोला - मुकेश भावसार
अकोला शहरात पुन्हा खुनी हल्ल्याने डोके काढले वर ....
शिवसेना उपशहर प्रमुखाच्या हत्येच्या घटनेला २४ तास पूर्ण होत नाही, तोच सोमवार दि.३१ ऑक्टोबर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जुने शहरातील हमजा प्लॉट भागात ३० वर्षीय युवका वर धारदार शस्रणे वार करून निर्घुण हत्या करण्यात आली.
अनोळखी हल्लेखोराने अमीन खानला रक्ताच्या थारोळ्यात पाडला. गंभीर जखमी अमीनला रक्ताच्या थारोळ्यात पाहून हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला.जखमी अवस्थेतच अमीन खान याला नागरिकांनी जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.परंतु याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुढील तपास जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे करीत आहेत.
0 Comments