अमळनेर :- विकी भावसार
रविवार, दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजीअमळनेर भावसार क्षत्रिय समाज व अखिल महाराष्ट्र भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तनिवास वाडी चौक अमळनेर येथे विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कु.देवयानी भावसार हिने स्वागत गीत सादर केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री हिंगलाज माता प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. दीपक विश्वनाथशेठ भावसार,मालपूर (अध्यक्ष संयुक्त खान्देश) हे होते. तसेच प्रमुख पाहुणे प्रा. डॉ.अरुण बी.कोचर सर ताईसो भैरवी अपूर्व पलांडे -वाघ श्री मिठाराम पुनमचंद शेठ भावसार धुळे,श्री.अरुण रामप्रसाद शेठ भावसार,अमळनेर पारितोषिक दाते श्री संजय सुधाकर शेठ भावसार व सौ.मेघा गणेशशेठ भावसार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
समाजाचे अध्यक्ष श्री.सुरेश नारायण भावसार यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी अखिल महाराष्ट्र भावसार समाजाच्या वतीने अध्यक्ष श्री. अरुण रामप्रसाद भावसार यांच्या हस्ते धुळे समाजाचे माजी अध्यक्ष श्री.अण्णासाहेब मिठाराम पुनमचंद शेठ भावसार यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तर आझाद नायक न्युजचे संपादक मुकेश ( विकी ) भावसार यांची महाराष्ट्र भावसार समाजच्या अखिल महाराष्ट्रच्या प्रसिद्ध प्रमुख पदी नियुक्ती करून सत्कार करण्यात आला.
श्री. प्रा. अरुण कोचर सर व भैरवी ताई वाघ - पलांडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. याप्रसंगी समाज बांधव भगिनी व गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीते साठी समस्त समाज बांधव तसेच प्रा. श्री.प्रवीण कुमार रणछोडदास भावसार, श्री. कृष्णकांत जगन्नाथ भावसार ,
श्री. कुंदन गोपीनाथ भावसार,
श्री. शामकांत मिठाराम भावसार ,
श्री. रविंद्र प्रभाकर भावसार,
श्री. नंदलाल रतिलाल भावसार,
श्री. दीपक तुकाराम भावसार ,
श्री. निलेश गोकुळ भावसार, तसेच
श्री. निलेश विजय भावसार( प्रतिनिधी सं.खा.) व नवयुवक मंडळाचे अध्यक्ष पंकज भावसार, भरत भावसार, अमोल भावसार, प्रा.देवेश भावसार, मकरंद भावसार शैलेश भावसार,यश भावसार, हरीष भावसार,अक्षय भावसार, निखिल भावसार, इत्यादी सदस्य व महिला मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाला समाजातील असंख्य बंधु - भगिनी, वयोवृद्ध, तसेच बालगोपाल मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण समिती चेअरमन श्री सागर सुभाषशेठ भावसार यांनी केले तर आभार प्रदर्शन खजिनदार परेश शांतीलाल भावसार यांनी केले.
0 Comments