Header Ads Widget

Responsive Image

उद्या शांतता कमिटी सदस्यांच्या बैठकीचे आयोजन.. उपस्थित राहण्याचे आवाहन.... पोलीस निरीक्षक जयपाल हिरे

अमळनेर :-मुकेश (विकी ) भावसार 

आगामी सण उत्सव व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवार दि.२७ ऑगस्ट रोजी शांतता कमिटी सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन G. S.हायस्कूल, श्री स्वामी समर्थ केंद्रासमोर,शाळेतील हॉलमध्ये करण्यात आले आहे. शनिवार दि.२७ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे तसेच आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, कृषीभूषण साहेबराव पाटील, स्मिता वाघ उपस्थित राहणार आहेत. तसेच तहसीलदार अमळनेर, मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद, कार्यकारी अभियंता PWD,अभियंता MSCEB नगराध्यक्ष अमळनेर नगरपरिषद, सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व शांतता कमिटी सदस्य, सर्व पत्रकार बांधव, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कमिटी सदस्य यांची बैठक आहे.

तरी सर्व मान्यवरांनी या बैठकीस दु. १ वाजता हॉलमध्ये उपस्थित रहावे असे आवाहन अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments