घरकुल मंजुरीबाबत शिवसेनेचा आक्रमक मोर्चा
त्यामुळे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह शिवसैनिकांनी थेट प्रवेशद्वारा वरून उड्याघेत आवारात प्रवेश केला. काहींना सुरक्षा रक्षक व पोलिसांना लोटालाटी करीत प्रवेश उघडले व आत प्रवेश केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी मनपा प्रशासनाच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकोला महानगरपालिका प्रशासनाला घरकुला संदर्भात निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ मोर्चा आल्यानंतर घोषणाबाजी करीत मोर्चेकऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करून घेतले होते.
काही मोजक्या मोर्चकऱ्यांना आत जाण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, सर्वांनाच आत जाऊ देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.त्याला सुरक्षा रक्षकांनी विरोध व उपस्थित पोलिसांनी विरोध केल्यामुळे राजेश मिश्रा यांच्यासह मोर्च्यात सहभागी झालेल्या शिवसैनिकां नी थेट प्रवेशद्वारावर चढून मनपा कार्यालयाच्या आत धाव घेतली.
उर्वरित शिवसैनिकांनी सुरक्षा रक्षकांसह पोलिसांना लोटालाटी करीत प्रवेशद्वार लोटून बळजबरीने उघडले व आत प्रवेश केला. त्यानंतर उपायुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यासोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
या मोर्च्यात राजेश मिश्रा, तरूण बगेरे, नितीन मिश्रा, गजानन चव्हाण, शरद तुरकर, देवा गावंडे, रुपेश ढोरे, मंजुषा शेळके, योगेश अग्रवाल, अनित मिश्रा, सुनिता श्रीवास आदींसह शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिव सैनिक सहभागी झाले होते.
बळजबरीने मनपा कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार लोटून आत प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांविरुद्ध महानगरपालिका प्रशासनाने सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिली.
अकोला महानगरपालिका प्रशासनातर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६८ हजार घरकुलांचे प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी सात हजार घरकुलांना आतापर्यंत मान्यता मिळाली. त्यातील केवळ ९०० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
उर्वरित लाभार्थ्यां बाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांचे होत असलेले हाल बघता शिवसेनेतर्फे तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी करणारे निवेदन मनपा प्रशासनाला देण्यात आले.
0 Comments