Header Ads Widget

Responsive Image

साडीचा झोका तुटल्याने दिड वर्षीय बालिकेचा करुण अंत तर दोन्ही बहिणी जखमी


साडीचा झोका तुटल्याने दिड वर्षीय बालिकेचा करुण अंत तर दोन्ही बहिणी जखमी


एरंडोल :- तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. सावदे प्र.चा.येथे धनसिंग शीला पावरा हे कुटूंबा सह वास्तव्यास असून गेल्‍या अनेक वर्षांपासून ते गावा तील शेतकऱ्यांची शेती बटाईने करुन परिवाराचा उदरनिर्वाह करतात.

दरम्‍यान शनिवारी १८ जून सकाळी धनसिंग व त्याची पत्नी शेतात गेले होते. तर धनसिंग यांची आई व त्याच्या तीन मुली घरी होत्या. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीचा झोका बांधला होता. झोक्यात तीनही मुली खेळत असतानाच अचानक साडीचा झोका तुटला यात अर्चना पावरा या दीड वर्षाच्‍या बालिकेचा मृत्यू झाला.तर तिच्या साडेतीन वर्षे व पाच वर्ष वयाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. दोघींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयत अर्चना हिच्यावर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments