कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही.. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेली माहिती आज सायंकाळी ५ वाजून ४१ मि.१८ सेकंदांच्या सुमारास घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
या परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के बसल्याने मालमत्तेची कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही तसेच नागरिकां च्या जीवाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
२०.५३०N व ७७.०८०E या अक्षांश रेखांशावर हे केंद्र असून रिक्टर स्केल वर ३.५० इतकी तीव्रता नोंदविण्यात आली.
तसेच भुकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाले नाही अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
अकोल्याचे हवामान विभागाचे सहायक वैज्ञानिक मिलिंद धकिते व कार्तिक वनवे यांनी याबाबत भारतीय सेस्मॉलॉजीकल विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाच्या आधारे हीमाहिती दिली आहे.
0 Comments