तालुक्यातील शेळावे खुर्द येथे मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आलीय. शेळावे खुर्द येथील बापू सांगळे यांचे सख्खे भाऊ दत्तू सांगळे यांच्या सोबत गेल्या सुमारे सात वर्षांपासून वाद सुरू आहेत. या दोन्ही भावांची शेती लागून असून विहीरीवर पाणी भरण्याचा सामयिक अधिकार आहे. मात्र या दोन्ही भावांमध्ये बांधासह पाणी भरण्यावरून वाद सुरू आहेत.
शुक्रवार दिनांक १० जून रोजी सकाळी पाणी भरण्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. यात अलकाबाई बापू सांगळे, विद्या महेंद्र सांगळे, मनीषा दत्तू सांगळे, दत्तू सांगळे हे आपापल्या शेतात काम करत असतांना पाण्याचा पंप बंद केल्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात विद्या सांगळे व मनीषा सांगळे या जखमी झाल्या .
यानंतर दत्तू सांगळे यांचा मुलगा राहुल उर्फ सोनू सांगळे याने त्याच्या मालकीचे MH - 19, CY - 8183 क्रमांकाचे छोटा हत्ती हे वाहन भरधाव वेगाने आपल्या काकू अलकाबाई बापू सांगळे यांच्या अंगावर घातले. यामुळे अलकाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी राहुल उर्फ सोनू सांगळे याला पोलिसांनी अटक केली असून सदरील घटनेचा तपास स.पो.नि. राजू जाधव करीत आहेत.
0 Comments