महिला व बालविकास प्रकल्प अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनिस ह्याच्यावर कामाचा बोजा हा नेहमी असतोच.
महिला गरोदर असल्यापासून ते बाळ जन्माला येण्यापर्यंत, बाळ कुपोषित तर नाही नां, आहार वाटप, किशोरवयीन मुलींना आरोग्याची माहिती देणे, लहान मुलांना शिकविणे,अश्या अनेक प्रकारच्या कामासाठी अंगणवाडी सेविका व मदतनी स ताई नेहमी पुढे असते.
परंतु अश्या सर्वांची काळजी घेणाऱ्या ताई घराची जबाबदारी सांभाळून अंगणवाडीची हि जबाबदारी अतिशय निष्टेने पार पाडते.आणि शेवटी तिच्या पदरी निराशाच....
वेळेवर पगार नाही , कुठल्याही प्रकारचे आरोग्य तपासणी नाही... कुठला विमा नाही
त्यात तिला कवडिमोल पगार त्यात ती ऑटोने ये - जा करेल का? मुलांचे शिक्षण करेल का घरात किराणा भरेल, दवाखाना करेल असा यक्ष प्रश्न त्यांचा समोर उभा राहतो काहींच्या तर मुली लग्नाच्या झाल्या आहेत. आता लग्नाचे टेंशन करावे तर काय करावे. आणि पगार वाढ केली म्हणतात परंतु अजुन त्याचे काही खरे नाही... पगारवाढ नाही व आहे तों पगार देखील वेळेवर होत नाही सण उत्सव येतात परंतु यांच्या घरात नाही सण नाही उत्सव.... नाही त्यांची आरोग्य तपासणी फक्त काम... काम... काम...
एकीकडे सरकार महिलांना सक्षम करीत आहेत. परंतु जे समाजात महिलांचे व बालकांचे आरोग्य जपतात, योग्य सल्ला देतात, आज त्यांचेच हाल चालु आहेत.
तरी संबंधित महिला व बालविकास मंत्री अधिकारी या सेविका - मदतनीस ताईंना न्याय मिळवून देतील का? यावर सर्व सेविका - मदतनीस यांचे लक्ष लागून आहे...
0 Comments