Header Ads Widget

Responsive Image

नवाब मालिकानां ईडी चा दणका , ८ मालमत्ता ईडी कडुन जप्त

मुंबई | राज्याचे मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या अटकेत आहेत.

सक्तवसूली संचलनयाने दाऊदशी संबंधित मालमत्ता व्यवहारांमध्ये हात असल्याच्या कारणावरून मलिक यांना अटक केली आहे.
तेव्हापासून ईडीनं मलिकांच्या अनेक ठिकाणच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

उस्मानाबाद येथील आणि मुंबईतील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. परिणामी राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड आणि कुर्ला पश्चिम येथील व्यवसायिक जागा ईडीनं जप्त केली आहे. ईडीकडून आतापर्यंत मलिक यांच्या ८ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यातील उस्मानाबाद येथील तब्बल १४८ एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. कुर्ला येथील तीन प्लाॅट्स देखील जप्त करण्यात आले आहेत. वांद्रे पश्चिम येथील ३ राहती घरं देखील ईडीनं जप्त केली आहेत. अनेक व्यवहारात अनियमितता आढळली असल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, ईडीकडून मलिक यांना अद्यापी कसलाही दिलासा मिळाला नसल्यानं राज्यात त्यांच्या राजीनाम्याची मागणी चालूच आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे पाहणं गरजेचं आहे.

Post a Comment

0 Comments