Header Ads Widget

Responsive Image

चाळीसगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई एक कोटींचा मुद्देमालासह गुटखा जप्त

चाळीसगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई एक कोटींचा मुद्देमालासह गुटखा जप्त

चाळीसगावात ग्रामीण पोलिसांनी आज गुटख्याचा कंटेनर पकडला असून यात सुमारे एक कोटीचा मुद्देमाल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करणे सुरू आहे.
चाळीसगावात ग्रामीण पोलीसांनी एका कंटेनवर संशय आल्याने त्याचा पाठलाग करून तो पकडला.
या कंटेनरची अधिक तपासणी केली असता कंटेनटर मध्ये गुटखा भरलेला असल्याचे दिसून आले. सुमारे एक कोटी रुपयांचा हा गुटखा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या धडाकेबाज कामगिरीमुळे ग्रामीण पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

(गाडी क्र. HR ३८ एबी ६०९६ ) असे पकडलेल्या गाडीचा नंबर आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आल्याने गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे.
तीन दिवसांपूर्वीच भुसावळ येथे अशाच प्रकारे मोठी कारवाई करण्यात आली होती.

यानंतर चाळीसगावात हा कंटेनर जप्त करण्यात आल्यामुळे गुटखा तस्करीची पाळेमुळे तालुक्यात असल्याची चर्चा देखील नव्याने सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments