Header Ads Widget

Responsive Image

संगीतमय पाडवा पहाट चे आयोजन

संगीतमय पाडवा पहाट चे आयोजन


हिवरखेड प्रतिनिधी:- धिरज बजाज

हिवरखेड येथील अनेक सामजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड तर्फे गुडीपाडव्या निमित्त शनिवार 2 एप्रिल रोजी पहाटे ठीक 6 वाजता संगीतमय पाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
  सदर पाडवा पहाट कार्यक्रम सेंट पॉल अकॅडमीच्या प्रांगणात पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडचे विद्यार्थी व सिंफणी मेलोडीज, अमरावती यांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक लोकजागर मंचचे श्री अनीलभाऊ गावंडे राहतील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ उद्यमी श्री प्रमोदजी चांडक हे राहणार आहेत.
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडे तीन मुहूर्तां पैकी हा एक मुहूर्त आहे.
 या दिवशी घराबाहेर उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मो त्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.सेंट पॉल एकेडमी शैक्षणिक कार्या सोबतच सांस्कृतिक उद्बोधन व भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचा ही मोठं काम करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतेच व सेंट पॉल ऍकॅडमी पालक वर्गाने व हिवरखेड वासियांनी तसेच तेल्हारा तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा,आनंद घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री नवनीत लखोटीया,संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक,संस्थेचे उपाध्यक्ष लुनकरणजी डागा  व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांतजी तिवारी इत्यादींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments